गांधींचा ईश्वर पारंपरिक पद्धतीचा ईश्वर नाही, तो पूर्ण सत्याच्या रूपातला होता. मात्र गोरांना कोणत्याही रूपातला ईश्वर मुळातच मान्य नव्हता, इतके ते कट्टर नास्तिक होते…

गांधीजींचा ईश्वर कुठल्याही अर्थाने चमत्कार करणारा, स्वत:चे अस्तित्व त्या आधारे टिकवून ठेवणारा अशा प्रकारचा ईश्वर नाही. त्यांची ईश्वराची कल्पना निराकार पद्धतीची आहे. त्यांना कुठल्याही कर्मकांडाची गरज भासत नाही. गोरांच्या समोर असलेली ईश्वराची संकल्पना आणि तिची समाजात असलेली राबवणूक आणि गांधीजींचा ईश्वर यांचा मेळ जमून येत नाही. तरीही गोरा गांधीजींशी संवाद करताना त्याच ईश्वर कल्पनेच्या आधारे बोलतात.......

महात्मा गांधींची महर्षि शिंद्यांसारखी उपेक्षा झाली नाही आणि होणारही नाही, पण शिंद्यांच्या वाट्याला ‘उपेक्षा’ आली आणि गांधींच्या वाट्याला ‘विकृतीकरण’…

महात्मा गांधी आणि महर्षी शिंदे ही दोन माणसं एकच कालखंड जगली. शिंद्यांचा जन्म १८७३चा, गांधींचा १८६९चा. शिंद्यांचा मृत्यू १९४४चा आणि गांधींचा १९४८ सालचा. म्हणजे जवळपास भारतीय राजकारणामध्ये ज्यांनी एकाच कालखंडात काम केलेलं आहे, असं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य या दोघांच्या संदर्भात दाखवता येतं. महाराष्ट्राच्या समताविषयक चर्चाविश्वात शिंद्यांची उपेक्षा विद्वानांकडून झाली आणि गांधींचीही दखल अलीकडे घेतली जात नाही.......

शास्त्रीजी ‘परंपरावादी’ झाले नाहीत, मार्क्सचा प्रभाव पडून ‘मार्क्सवादी’, गांधींचा बौद्धिक-नैतिक प्रभाव असून ‘गांधीवादी’ आणि रॉय यांचा प्रभाव पडून ‘रॉयवादी’ही झाले नाहीत (उत्तरार्ध)

शास्त्रीजींनी मार्क्सिझम, सोशॅलिझम, रॉयीझम, गांधीवाद, या सगळ्या विचारधारा खूप तपशिलाने अभ्यासल्या होत्या. धर्मशास्त्र अभ्यासलेलं होतं, परंतु तत्त्वज्ञ होण्याची क्षमता असूनही एका नव्या ‘दर्शना’ची निर्मिती काही त्यांच्याकडून होऊ शकली नाही. त्यांच्याच काळामध्ये जावडेकरांनी एक प्रयत्न केला मार्क्सवाद आणि गांधीवादाच्या समन्वयाचा. अशा कुठल्याही ‘दर्शना’ची निर्मिती शास्त्रीजींकडून झाली नाही.......

गांधीजींचे व्यक्तिमत्त्व, गांधीविचारांचे काही पैलू, यावर प्रकाश टाकणाऱ्या या पहिल्या खंडात, सर्वच अभ्यासकांनी गांधींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे केवळ आकलनच मांडले नाही, तर गांधी विचारांच्या प्रस्तुततेचेही अधोरेखन केले आहे!

जवळजवळ पाच पिढ्यांमधल्या अभ्यासकांच्या लेखांचा यात समावेश आहे. टिळक-टागोरांची एक पिढी, नेहरू-आचार्य भागवत यांची एक पिढी, कुरुंदकर-पळशीकर यांची एक पिढी, चौसाळकर-सुमंत यांची एक पिढी व आताची चैत्रा रेडकरांची पिढी. पहिल्या मराठी गांधी चरित्राला टिळकांनी प्रस्तावना लिहिल्याला शंभर वर्षे होऊन गेल्यावरही गांधींचे व्यक्तित्व, गांधीविचार अभ्यासकांना खुणावत आहे, चिकित्सेचा मोह घालत आहे.......